पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय क्रिकेटर मजुरांच्‍या मदतीला धावला, पाहा व्हिडिओ

लॉकडाऊनमुळे मजदूरांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संयम पाळून घरात बसण्याचा सल्ला देशवासियांना दिला होता. लॉकडाऊनच्या या निर्णयामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे चांगलेच हाल होत आहेत. उपासमारीची वेळ आलेल्या मजुरांच्या मदतीसाठी भारताचा क्रिकेटर शेल्डन जॅक्सनही धावून आल्याचे पाहायला मिळाले. 

वर्ल्ड कप : धोनी-युवी शिवाय या त्रिकुटाचे योगदानही अविस्मरणीयच!

सोशल मीडियावर शेल्डन जॅक्सनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून त्याने मदतीसाठी घेतलेल्या पुढाकाराचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सुरेश रैना, सौरव गांगुली, ईशान पोरेल, , युजवेंद्र चहल, केएल राहुल यासारख्या अनेक खेळाडूंनी कोरोनाच्या संकटात मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान शेल्डन जॅक्सन मजुरांच्या खानपानाची व्यवस्था करताना पाहायला मिळाले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शेल्डन जॅक्सनने आपल्या परिने मदत कार्य केले.  

प्रेरणादायीःकोरोनाविरोधात लढण्यासाठी हेडकॉन्स्टेबलने दिले १० हजार

देशात आतापर्यंत दोन हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या मृतांचा आकड्याने पन्नाशी पार केली आहे. दिवसागणिक हा आकडा वाढत आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे देश थांबला असून रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प असल्यामुळे कामाच्या निमित्ताने गाव सोडून शहरात अडकलेली मंडळी मोठ्या संकटात सापडली आहे. त्यांच्या जेवणाचा राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडूनही त्यांना मदतीची ग्वाही देण्यात आली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India cricketer Sheldon Jackson comes to migrant workers aid distributes food items among them watch video