यशस्वी जैस्वालचे नाबाद शतकी खेळी आणि दिव्यांश सक्सेनाच्या नाबाद ५९ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानला १० गडी राखून पराभूत केले. या विजयासह युवा टीम इंडियाने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग तिसऱ्यांदा पोहचण्याची ऐतिहासिक कामगिरी नोंद युवा टीम इंडियाच्या नावे झाली आहे.
पाकविरुद्ध सलामी जोडगोळी पुरुन उरली, युवा टीम इंडिया फायनलमध्ये
यापूर्वी २०१६ मध्ये युवा टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली होती. अंतिम सामन्यात कॅरेबियन संघाकडून युवा टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर भारतीय संघाने २०१८ मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत प्रवेश केला. यावेळी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने विश्वटचष उंचावला होता. उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर जैस्वाल नाबाद १०५ आणि दिव्यांग सक्सेनाने नाबाद ५९ धावांच्या खेळी केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी रचली. हा देखील एक विक्रम आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यातील पहिल्या विकेटची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
Video : पाकविरुद्धच्या सामन्यातील हा अप्रतिम झेल पाहिलात का?
जैस्वालने ११३ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद १०५ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला सक्सेनाने ९९ चेंडू ६ चौकाराच्या मदतीने नाबाद ५९ धावा करत संयमी खेळ दाखवला. या सामन्यातील दमदार खेळीनंतर यशस्वी जैस्वाल स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरलाय. त्याने ५ सामन्यात ३१२ धावा केल्या आहेत.