पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंडर-19 आशिया कपः बांगलादेशचा पराभव करत भारताने सातव्यांदा पटकावला चषक

अंडर-19 आशिया कपः बांगलादेशचा पराभव करत भारताने सातव्यांदा पटकावला चषक

कोलंबो येथील आर के प्रेमदासा स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या अंडर-19 आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताने बांगलादेशचा ५ धावांनी पराभव केला. कमी धावसंख्येच्या अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात करण लाल (३७), कर्णधार ध्रुव जोरेल (३३) आणि गोलंदाज अर्थव अंकोलेकरच्या (५ विकेट) खेळीच्या जोरावर विद्यमान विजेत्या भारतीय संघाने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ३२.४ षटकांत अवघ्या १०६ धावांत संपुष्टात आला. अत्यंत सोपे आव्हा घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाला भारतीय गोलंदाजांनी १०१ धावांतच गुंडाळले. भारताने सातव्यांदा १९ वर्षांखालील आशिया चषकाचा किताब आपल्या नावे केला. १९८९, २००३, २०१२, २०१३-१४, २०१६, २०१८ मध्ये भारताने हा किताब पटकावला होता. विशेष म्हणजे भारताने चार वर्षांत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले आहे.

INDvsSA Test: विराटचा 'लाडला' बाहेर! रोहित शर्मा संघात

विजयासमीप जाऊनही बांगलादेशचा पराभव

७८ धावांवर ८ गडी गमावणाऱ्या बांगलादेशाला तळातील तन्जीम हसन शाकिब (१२) आणि रकिबुल हसनने (नाबाद ११) विजयाजवळ पोहोचवले होते. बांगलादेश विजय मिळवणार असे वाटत असतानाच अथर्वने तन्जीम आणि दोन चेंडूनंतर शाहीन आलमला बाद करुन त्यांच्या अपेक्षांचा चुराडा केला. 

तत्पूर्वी बांगलादेश संघ सुरुवातीपासूनच आपल्या विकेट गमावत होता. कर्णधार अकबर अलीने बांगलादेशकडून सर्वाधिक २३ धावा बनवल्या. त्याच्याशिवाय मृत्यूजंय चौधरीने २१ धावांचे योगदान दिले. 

INDvsSA, 1st T20: विराट-रोहितची 'या' विक्रमांवर असेल नजर

अथर्व अंकोलेकर सामनावीराचा मानकरी

भारताकडून सामनावीर ठरलेल्या  अथर्व शिवाय आकाश सिंहने तीन विकेट आपल्या नावे केल्या. सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील यांनी एक-एक विकेट घेतली. 

भारताच्या डावाची सुरुवातही चांगली झाली नव्हती. तीन धावसंख्येवर संघाने अर्जुन आझादची विकेट गमावली. आठ धावांवर भारताने तीन विकेट गमावल्या होत्या ५३ धावसंख्येवर भारताच्या सलग दोन विकेट गेल्या. अथर्वही दोन धावा काढून बाद झाला. करणने एकट्याने चिवट खेळी करत संघाला कसेबसे १०० धावांपर्यंत पोहोचवले. टीमची शेवटची विकेट त्याच्याच रुपात पडली.