बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या ऑस्ट्रेलियाला ७ गडी राखून पराभूत करत मालिका २-१ अशी खिशात घातली. क्षेत्ररक्षणावेळी सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्यानंतर रोहित शर्माने त्याची शतकी खेळीनं त्याची उणीव भरून काढली. कर्णधार विराट कोहलीनं त्याला सुरेख साथ देत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले.
INDvsAUS: कांगारुंचा वचपा काढला, बंगळुरुमध्ये रोहित-विराट हिट शो!
विराट कोहली विजयी धाव घेऊन परतणार असे वाटत असताना हेजलवूडच्या एका अप्रतिम चेंडूवर तो बोल्ड झाला. तत्पपूर्वी या सामन्यात त्याने भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. एवढेच नाही तर त्याने एक अनोखा पराक्रमही आपल्या नावे केला होता. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक जलद ५ हजार धावा पूर्ण करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी पोहचला आहे.
आपली शंभरी झाल्यावर कुलदीपनं स्मिथला 'नर्व्हस' करत सामना फिरवला
मैदानात उतरण्यापूर्वी चार धावा पूर्ण करताच त्याने हा पराक्रम आपल्या नावे केला. विराट कोहलीने ८२ व्या डावात पाच हजारीचा टप्पा गाठला आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १२७ डावात ५ हजारचा टप्पा पार केला होता. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या स्थानावर आहे. पाँटिंगने १३१ डावात हा पल्ला पार केला होता. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधाराला हा पल्ला गाठण्यासाठी १३५ डाव खेळावे लागले होते. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलींनी १३६ डावात पाच हजारीचा पल्ला गाठला होता.