पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक चॅम्पियनशीपः मेरी कोमला कांस्य पदक, तुर्कीच्या खेळाडूकडून पराभव

मेरी कोमला कांस्य पदक, तुर्कीच्या खेळाडूकडून पराभव

भारताच्या मेरी कोमचा जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये ५१ किलोग्रॅम वजनी गटात सेमीफायनलमध्ये तुर्कीच्या बुसेनांज कारिकोग्लूकडून पराभव झाला. या पराभवामुळे सहा वेळच्या जागतिक चॅम्पियन मेरी कोमला यावेळी कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. कारिकोग्लूने मेरी कोमचा ४-१ ने पराभव केला. 

कारिकोग्लूविरोधात मेरी कोमने सावध सुरुवात केली. पहिल्या फेरीत मेरीने प्रतिस्पर्धीच्या हालचाली टिपल्या. यावेळी मेरी आक्रमक दिसली नाही. मेरीने दुसऱ्या बाऊटमध्ये युरोपीयन चॅम्पियनविरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. तिने जॅब आणि हुक लगावला.

मेरी कोम कारिकोग्लूला अनेकवेळा रिंगजवळ आणण्यात यशस्वी झाली. परंतु, दोन्ही खेळाडूंना जास्त यश मिळाले नाही. ही लढत चुरशीची राहिली. कारिकोग्लूला तिसरी फेरी यशस्वी ठरली. तिने दमदार जॅब आणि हुक मारत अनेक महत्वपूर्ण गुण मिळवले. बाऊट संपल्यानंतर पाच पंचांनी कारिकोग्लूच्या बाजूने २८-२९, ३०-२७, २९-२८ आणि ३०-२७ असा निकाल दिला. 

जडेजा नर्व्हस नाईंटीजचा शिकार, पण...

मेरी कोम ४८ किलोग्रॅम वजनी गटात सहा वेळा जागतिक चॅम्पियन राहिलेली आहे. ५१ किलोग्रॅम वजनीगटातील विश्वचषकातील तिचे हे पहिले पदक आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india applealed against the referee decision of mary kom defeat in world women boxing championship get bronze