पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvWI 1st Test Match : अखेर रहाणेनं दोन वर्षांचा दुष्काळ संपवला

अजिंक्य रहाणे

विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतकी खेळीला मुकल्यानंतर भारताचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं दुसऱ्या डावात अखेर कसोटीतील दहावे शतक पूर्ण केले. मागील दोन वर्षांत रहाणेच्या भात्यातून निघालेले हे पहिले शतक आहे. कदाचित त्यामुळेच रहाणेनं शतकानंतर फारसा मोठ्या तोऱ्यात जल्लोष केला नाही. मात्र केमार रोचच्या षटकात एकेरी धावेसह शतकाला गवसणी घातल्यानंतर त्याला फार मोठा दिलासा मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शतकी धाव घेतल्यानंतर त्याने दुसऱ्या बाजूला साथ उत्तम साथ देणाऱ्या हनुमा विहारीची गळाभेट घेत साध्यापणाने शतकाचा आनंद व्यक्त केला. 

BWF WC 2019: अखेर सिंधूने सुवर्ण कामगिरी करुन दाखवली

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणेला संधी द्यावी की विश्वचषकात दमदार कामगिरी करणाऱ्या रोहितला खेळवावे, याविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. टी-२० आणि कसोटीमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या रहाणेला पहिल्या कसोटीमध्ये स्थान देत संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला. दोन्ही डावातील संयमी खेळीनं अजिंक्यने हा विश्वास सार्थही ठरवला.  

यापूर्वी ३ ऑगस्ट २०१७ मध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या भात्यातून शेवटचे शतक अनुभवण्याची संधी क्रिकेट चाहत्यांनी अनुभवली होती. श्रीलंका विरुद्ध कोलंबोच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रहाणेने १३२ धावांची दमदार खेळी केली होती. त्यानंतर रहाणेने १७ कसोटी सामन्यात भारताकडून प्रतिनिधीत्व केले. मात्र त्याला यापैकी एकाही सामन्यात शतकापर्यंत पर्यंत मजल मारता आली नव्हती. रविवारी विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतकाचा दुष्काळ अखेर संपवला. तिसऱ्या दिवशी ५३ धावांवर नाबाद राहिलेल्या रहाणेने चौथ्या दिवशीच्या खेळात केमार रोचच्या गोलंदाजीवर एक धाव घेत कसोटी कारकिर्दीतील आपले दहावे शतक झळकावले.  

Ashes 2019 : स्टोक्सची अविश्वसनीय खेळी, इंग्लंडने मैदान मारलं

त्याला दुसऱ्या बाजूने हनुमा विहारीने उत्तम साथ दिली. विहारी ५ वा कसोटी सामना खेळणाऱ्या हनुमा विहारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्या शतकाच्या उंबरठ्यावर होता. मात्र अवघ्या ७ धावांनी त्याचे शतक हुकले. तो ९३ धावांवर बाद झाल्यानंतर भारताने ७ बाद ३४३ धावांवर आपला डाव घोषित केला. त्यानंतर विंडीजला  १०० धावांत आटोपत भारताने पहिला कसोटी सामना १ दिवस राखून तब्बल ३१८ धावांनी खिशात घातला.