पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Test Championship : कांगारुंनी अ‍ॅशेस मारली तरीही विराट बिग्रे़डचं अव्वलस्थानी राहिल

कोहली आणि स्मिथ

अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर पोहचले. या क्रमवारीत विराट ब्रिगेड १२० गुणांसह अव्वलस्थानी आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या कसोटी मालिकेत जोरदार कामगिरी करत आहे.

Video : इंग्लंडची टीम हारली, पण स्टोक्सनं चाहत्यांची मनं जिंकली

अ‍ॅशेस मालिकेत त्यांचा आणखी एक सामना शिल्लक आहे. पण या सामन्यात दमदार विजय मिळवला तरी त्यांना भारतीय संघाला मागे टाकणे जमणार नाही. अर्थात भारताचे अव्वलस्थानाला तुर्तास कोणताही धोका नाही. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका प्रत्येकी ६०-६० गुणासह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड ३२ गुणांसह पाचव्या स्थानावर असून विंडीजला अद्याप खातेही उघडता आलेले नाही.

ASHES 2019 : चौथ्या कसोटीतील विजयासह कांगारु ठरले भारी

अफगाणिस्तान-बांगलादेश हे दोन संघ नुकतेच स्पर्धेत उतरले आहेत. तर दक्षिण आफ्रिका भारताविरुद्धच्या सामन्याने या स्पर्धेत मैदानात उतरणार आहे. 

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुण विभागणी
२ सामन्यांची कसोटी मालिका : विजय/बरोबरी/अनिर्णित =६०/३०/२०
३ सामन्यांची कसोटी मालिका:  विजय/बरोबरी/अनिर्णित =४०/२०/१३
५ सामन्यांची कसोटी मालिका: विजय/बरोबरी/अनिर्णित =२४ /१२/८
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:India 2 wins 120 points Australia 2 wins 1 draw 56 points Explaining the World Test Championship points table