Ind vs WI T20I 2019: भारताने टी-२० मालिका ३-० अशी जिंकत विंडीजला व्हाइट व्हॉश दिला. या विजयाबरोबरच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानचा एक मोठा विक्रम मोडला. विंडीजविरोधात सलग विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने आता पाकिस्तानला मागे टाकले आहे. विंडीजविरोधात भारताचा हा सलग सहावा विजय ठरला. तर पाकिस्तानने २०१६ ते २०१७ या कालावधीत विंडीजला सलग ५ वेळा पराभूत केले होते.
INDvWI 3rd T20I: कोहली ब्रिगेडचा विंडीजला व्हाइट व्हॉश
दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांनी कॅरेबियन संघाला टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग ४-४ वेळा पराभूत केले आहे. टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने ३-० असा प्रतिस्पर्धी संघाला व्हाइट व्हॉश देण्याची कामगिरी ४ वेळा केली आहे. २०१७ मध्ये श्रीलंकेविरोधात, २०१८ आणि २०१९ मध्ये वेस्ट इंडीजविरोधात भारताने ३-० असा विजय मिळवलेला आहे.
'मुला अजून POK बाकी आहे', गौतम गंभीरचे आफ्रिदीला 'परफेक्ट' उत्तर
तर दुसरीकडे वेस्ट इंडीजविरोधात एक लाजिरवाणी विक्रम नोंदवण्यात आला आहे. विंडीज टी २० प्रकारातील बलाढ्य संघ मानला जातो. पण या संघाच्या नावे टी २० आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक पराभवाचा विक्रम नोंदवला गेला हे. विंडीजने या प्रकारात श्रीलंका आणि बांगलादेशला मागे टाकले आहे. विंडीजच्या खात्यात ५८ पराभवाची नोंद आहे. तर श्रीलंका आणि बांगलादेशच्या खात्यावर ५७-५७ पराभव जमा आहेत. वेस्ट इंडीज एकमेव असा संघ आहे, जो २ वेळा आयसीसी विश्वचषक टी २० चा २ वेळा मानकरी ठरला आहे.