पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI: झिरोवर बाद झालेल्या पंतविरोधात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

ऋषभ पंत

India vs West Indies, 3rd T20I at Mumbai: भारत आणि  विंडीज यांच्यातील मुंबईच्या वानखेडेच्या मैदानातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात पंत पुन्हा अपयशी ठरला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर विराट कोहलीने युवा पंतला बढती दिल्याचे पाहायला मिळाले. मागील सामन्यात कोहलीने शिवम दुबेला आपल्या जागी पाठवले होते. त्याने ज्याप्रमाणे कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला तशी कामगिरी पंतला करता आली नाही. एवढेच नव्हे तर पंत खातेही उघडू शकला नाही. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे. 

हिटमॅन रोहितनं कॉट्रेलला षटकार खेचत रचला अनोखा विक्रम

चौथ्या क्रमांकावर फंलदाजीला येणाऱ्या पंतने मागील सात टी-२० सामन्यात ३३, १८, ६, २७, १९, ४ धावा केल्या होत्या. संघ मजबूत स्थितीत असताना मिळालेली बढतीच्या संधीचं सोन करण्यात तो अपयशी ठरला.  पोलार्डने त्याला शून्यावर माघारी धाडले. खराब कामगिरीनंतर त्याला संघातून हटवण्याची मागणी ट्विटरच्या माध्यमातून होताना दिसत आहे. 

पृथ्वीचा डबल धमाका, प्रथम श्रेणीतील पहिले द्विशतक

ऋषभ पंतच्या खराब कामगिरीनंतर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा धोनीची उणीव भासत आहे. एका नेटकऱ्याने पंतने स्थानिक क्रिकेटमध्ये अधिकवेळ घालवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया देत धोनीने पुन्हा संघात यावे, अशी भावना व्यक्त केली आहे. विश्वचषकापासून धोनी संघाच्या बाहेर आहे. निवड समितीने पंतला अधिक संधी देण्याचा निर्णय यापूर्वीच बोलून दाखवला आहे. याशिवाय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी देखील वेळोवेळी पंतची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले आहे.