भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात रंगणार आहे. निर्णायक टी२० सामना जिंकून भारतीय संघ मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल. तर दुसरीकडे पाहुणा विंडीज संघ पोलार्डाच्या नेतृत्वाखाली आपली ताकद दाखवून देण्यास प्रयत्नशील असेल.
Video : धावबाद सोडलं म्हणून कौतुकास पात्र ठरेला हा पहिलाच क्षेत्ररक्षक
सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर तिरुवनंतपुरमच्या मैदानात विंडीजने आपल्यातील क्षमता दाखवून दिली होती. विंडीजच्या गोलंदाजांनी आघाडीच्या फलंदाजांवर अंकूश ठेवण्यात यश मिळवल्याने त्यांना मालिकेत बरोबरी करता आली. मालिका जिंकण्यासाठी त्यांना हीच पुनरावृत्ती करावी लागेल.
धोनीसाठी मनापासून लिहिलेल्या विराटच्या 'त्या' पोस्टचाही अनोखा विक्रम
तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतो. रविंद्र जडेजाच्या जागी मोहम्मद शमीला संधी दिली जाऊ शकते. संघ व्यवस्थापन अष्टपैलूला बाहेर ठेवून शमीवर विश्वास दाखवणार का? हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरेल. वानखेडेची खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना अधिक अनुकूल राहू शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटण्याचे काम नाही. विंडीजचा धाकड फलंदाज एलेन गुडघ्याच्या दुखातपतीमुळे निर्णायक सामन्याला मुकणार आहे. त्याच्या जागी पोलार्ड अॅण्ड कंपनी कोणाला संधी देणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल.
वेस्टइंडिज संभाव्य संघ
लेंडल सिमन्स, एव्हिन लेविस, ब्रँडन किंग, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड (कर्णधार), कीमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, केसरिक विल्यम्स, खॅरी पीएरी, हेडन वॉल्श.