पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुला मानलं रे ठाकूर! विराटकडून शार्दुलचं मराठीतून कौतुक

विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर

India vs West Indies Ind vs WI 3rd ODI Match: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यासह मालिका जिंकत भारताने वर्षाचा शेवट गोड केला. कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेजा ही जोडी भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करुन परतेल असे वाटत असताना पॉलचा एक चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन स्टंम्पवर आदळला अन् तमाम भारतीय चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकला. विराट कोहली बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या शार्दुल ठाकूरने जडेजाला उत्तम साथ देत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.  

VIDEO : मुंबईकर शार्दुलनं जिंकलं अन् जिंकवलं, विराटही भारावला

कटकच्या मैदानातील निर्णायक सामन्यात शार्दुल ठाकूरने ६ चेंडूत १७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीचं कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. सामन्यानंतर विराट कोहलीने मराठीतून ट्विट करत शार्दुलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तुला मानलं रे ठाकूर! या शब्दांसह विराटने शार्दुलसोबतचा फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. विराटच्या या ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 

INDvsWI: होपला तंबूत धाडत शमीनं घातली विक्रमाला गवसणी

एका नेटकऱ्याने शार्दुला मराठीत शुभेच्छा देणाऱ्या विराटला तुम्हालाही मानलं सरजी! अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने भाऊ तुला मराठी पण येते? असा प्रश्न उपस्थित करुन विराट कोहलीच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. विंडीज विरुद्धच्या निर्णायक सामन्यात आपल्या १० षटकात शार्दुलने ६६ धावा खर्च करुन एक बळी मिळवला होता. विशेष म्हणजे त्याने मध्यफळीतील निकोलस पूरनची महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती. निकोलसने या सामन्यात ६४ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ८९ धावांची धमाकेदार खेळी केली होती. त्याच्या खेळीला ब्रेक लावण्याचं काम शार्दुलनं केले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs wi 3rd odi virat kohli Marathi tweets for shardul thakur Tula maanla re Thakur india vs west indies odi series india series win