India vs West Indies, 3rd ODI at Cuttack: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना हा कटकच्या मैदानात रंगणार आहे. दोन्ही संघ प्रत्येकी एक-एक सामना जिंकून बरोबरीत आहेत. बाराबातीच्या स्टेडियमवर कोण भारी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दोन्ही संघ अंतिम सामन्यासह मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारतीय संघाने जर उद्याचा सामना जिंकत मालिका खिशात घातली तर विंडीज विरुद्ध सलग दुसरा द्विपक्षयी मालिका जिंकण्याचा विक्रम विराट सेनेच्या नावे होईल.
विक्रमादित्य सचिनने दिला 'त्या' वेदनादायी आठवणींना उजाळा
चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या सलामीच्या सामन्यात विंडीजने भारताला ८ गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर विशाखापट्टणमच्या मैदानात भारताने १०७ धावांसह विजय नोंदवत मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघात कोणाला संधी मिळणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल.
Video: IPL मध्ये कोट्यवधी उगाच मिळाले नाहीत हे मॅक्सवेलनं दाखवून दिलं
सलामीवीर रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात कमालीची फलंदाजी केली होती. अखेरच्या सामन्यात तो अशीच खेळी करण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे लोकेश राहुल त्याला कशी साथ देणार यावर भारताच्या विजयाचे गणित अवलंबून असेल. विराट कोहली एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरला आहे. सलामीच्या सामन्यात ४ धावा तर दुसऱ्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. अखेरच्या सामन्यात दमदार कामगिरीसह तो खराब कामगिरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
NDvsWI : रविवारच्या दिवशी पराभवाचा 'चौकार' रोखण्याचं आव्हान
मध्यफळीची जबाबदारी ही श्रेयस अय्यर, पंत आणि केदार जाधव यांच्यावर असेल. तर गोलंदाजीमध्ये अष्टपैलू रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी यांच्यावर असेल. भारतीय संघात दोन बदल पाहायला मिळू शकतात. दुखापतग्रस्त दीपक चाहरच्या जागी युवा नदीप सैनीला संधी मिळू शकते. याशिवाय युजवेंद्र चहलला देखील संधी मिळू शकते.