पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रविंद्र जडेजासोबतच्या इंग्लिश-विंग्लिशवर हर्षा भोगलेंचे प्रतिक्रिया

हर्षा भोगले, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय नोंदवला. मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात रविंद्र जडेजा (३९)* आणि शार्दुल ठाकूर (१७)* धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्यानंतर क्रिकेट समीक्षक आणि समालोचक हर्षा भोगले यांनी दोन्ही मॅच फिनिशसोबत संवाद साधला. या संवादावेळी रविंद्र जडेजासोबत संवाद करताना वापरलेल्या भाषेवरुन त्यांना ट्रोल करण्यात आले. ट्रोल करणाऱ्यांना हर्षा भोगले यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.    

VIDEO : मुंबईकर शार्दुलनं जिंकलं अन् जिंकवलं, विराटही भारावला

झाल असं की, सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी शार्दुल ठाकूरला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानेही मोकळ्यापणे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर रविंद्र जडेजाकडे वळल्यानंतर हर्षा भोगले यांनी आपली हिंदीमध्ये प्रश्न विचारला. रविंद्र जडेजाने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर इंग्रजीमध्ये दिले. दोघांच्यामधील त्यापुढील संवाद हा इंग्रजीत झाला. या प्रकारावरुन नेटकऱ्यांनी हर्षा भोगले यांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. रविंद्र जडेजासोबत पहिल्यांदा हिंदी आणि त्यानंतर इंग्रजीत संवाद साधल्यामुळे हर्षा भोगले यांना ट्रोल करण्यात आले.  

INDvsWI: होपला तंबूत धाडत शमीनं घातली विक्रमाला गवसणी

या मुद्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना हर्षा भोगले यांनी उत्तर दिले आहे. रविंद्र जडेजासोबतच्या संवादाबाबत मला अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. पोस्ट मॅच प्रेजंटेशनमध्ये तुम्ही नेहमी खेळाडू सहज व्यक्त होऊ शकेल त्या भाषेला प्राधान्य देता. मी जडेजाला १० वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे मी त्याच्या भाषेत संवाद करण्यास सुरु केला. ज्यावेळी त्याने मला इंग्रजीमध्ये बोलू शकतो असा इशारा केला त्यावेळी मी इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, असे ट्विट करत हर्षा भोगले यांनी ट्रोलर्संना प्रत्युत्तर दिले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs wi 3 match odi series harsha bhogle clarifies after facing critisism in twitter for interviewing ravindra jadeja in english watch video and see tweets