वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात उप-कर्णधार अजिंक्य रहाणेच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या दिवसाखेर भारताने ६ बाद २०३ धावा केल्या आहेत. सलामीवीर लोकेश राहुल (४४) आणि अजिंक्य रहाणे (८१) धावा वगळता आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रविंद्र जडेजा आणि ऋषभ पंत मैदानात खेळत होते. ही जोडी भारताच्या धावफलकावर किती धावा उभारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
INDvWI 1st Test Match: रोहित बाकावर, असा आहे भारतीय संघ
फिरकीपटू अश्विनला डावलून जडेजाला या सामन्यात संधी देण्यात आली आहे. या संधीच सोनं करण्याची त्याच्याकडे संधी आहे.
अश्विनऐवजी जडेजाला टीम इलेव्हनमध्ये मिळालेली संधी ही अनेकांना अयोग्य वाटते. यावर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रतिक्रिया दिली आहे. आँटिग्वाच्या मैदानातील खेळपट्टीचा विचार करता भारतीय संघाने ६ फलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर जेडेजासारख्या फलंदाजाची आवश्यकता होती. त्यामुळेच त्याला प्राधान्य देण्यात आले आहे, असे रहाणेनं म्हटलं आहे.
INDvWI 1st Test Match: रोहित-अजिंक्यबाबत गांगुलीचं थेट मत
यापूर्वी भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी अश्विन टीम इलेव्हनचा भाग नसल्याची खंत व्यक्त केली होती. विंडीजविरुद्ध चांगल्या कामगिरी केली असताना त्याला बाहेर बसवल्याचे आश्चर्य वाटते. अश्विनने विंडीजविरुद्ध खेळलेल्या ११ कसोटी सामन्यात ५०.१८ च्या सरासरीने ५२२ धावा केल्या आहेत. यात चार शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ६० बळी देखील टिपले आहेत. दुसरीकडे जडेडाने विंडीज विरुद्धच्या ४ सामन्यात ४१.६६ च्या सरासरीनं केवळ १२५ धावा आणि १० विकेट्स घेतल्या आहेत.