पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI, 1st T20: विंडीज दौरा पंतसाठी मोठी संधी : कोहली

विराट कोहली आणि ऋषभ पंत

विंडीज विरुद्धच्या दौऱ्यात धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला तिन्ही प्रकारात संधी देण्यात आली आहे. पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी याच मुद्यावर विराट कोहलीने पंतला प्रोत्साहन देणारे वक्तव्य केले आहे. धोनीच्या अनुपस्थितीमुळे तिन्ही प्रकारात मिळालेली संधी ही पंतसाठी मोठी संधी आहे. चांगली कामगिरी करुन त्याने संधीचं सोनं करावे, असे कोहलीने म्हटले आहे.  

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या भविष्याबाबत कोणताही अंदाज लावणे सध्याच्या घडीला शक्य नाही. परंतु विंडीज दौऱ्यावर पंतला संधी देत भविष्यात भारतीय संघाची पहिली पसंती तोच राहिल, असे संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी देखील दिले होते.

भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायचं आहे, पण..: सौरभ गांगुली

पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना विराट म्हणाला की, विंडीज विरुद्धची मालिका ऋषभ पंत सारख्या युवा खेळाडूसाठी चांगली संधी आहे. त्याने तिन्ही प्रकारात चांगली कामगिरी करुन आपली क्षमता सिद्ध करुन दाखवायला हवी. चांगली कामगिरी इथून पुढे त्याला अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी निर्माण करुन देईल. कोहली पुढे म्हणाला की, आपल्याला सर्वांना त्याची (ऋषभ पंत) क्षमता माहित आहे. त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करावी, अशीच सर्वांची भावना आहे. एमएस धोनीच्या अनुभवाचा संघाला नेहमीच फायदा झाला आहे. त्याच्या जागेवर संधी मिळणे पंतसाठी मोठी संधी आहे.  

INDvsWI, 1st T20: रोहित शर्मा मोडणार गेलचा रेकॉर्ड ?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ind vs wi 1st t20 ms dhoni absence great opportunity for rishabh pant to become a consistent performer says virat kohli