भारत आणि विंडीज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. गयाना येथील प्रॉव्हिडन्स मैदानावर हा सामना होत आहे. या सामन्यात विंडीजचा स्टार फलंदाज ख्रिस गेल मैदानात उतरणार आहे. या सामन्यात तो ब्रायन लाराचा एक विक्रम मोडण्याची शक्यता आहे. त्याने ११ धावा केल्यास विंडीजकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.
ख्रिस गेलने विश्वचषकानंतर भारताविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. विंडीजकडून महान फलंदाज ब्रायन लाराने एकदिवसीय प्रकारात २९५ सामन्यांत सर्वाधिक धावा केल्या आहेत. लाराने १०३४८ धावा केल्या आहेत.
'फिट है बॉस'!, विराटने शेअर केला २०१६ आणि २०१९ चा व्हिडिओ
गेलनेही २९५ सामने खेळले आहे. त्याचा आजचा २९६ वा सामना आहे. गेलच्या खात्यात १०३३८ धावांची नोंद आहे. ११ धावा केल्यास गेल लाराच्या पुढे जाईल. तिसऱ्या क्रमांकावर शिवनारायण चंद्रपॉल आहे. त्याने २६८ सामने खेळले आहेत.
डेसमंड हेन्सला मागे टाकू शकतो गेल
त्याचबरोबर गेल आणखी एक विशेष विक्रम आपल्या नावाने करु शकतो. भारताविरोदात विंडीजकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही तो नोंदवू शकतो. डेसमंड हेन्सने भारताविरोधात सर्वाधिक १३५७ धावा केलेल्या आहेत. गेलच्या खात्यावर १२४७ धावांची नोंद आहे. त्याला १११ धावांची गरज आहे. गेल्सच्या पुढे सध्या चंद्रपॉल (१३१९ धावा), रामनरेश सरवान (१२९६) आणि कार्ल हुपर (१२७९) आहेत.