पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IndvsSL: पुण्याच्या मैदानात कोहलीसमोर असेल हे 'विराट' चॅलेंज

विराट कोहली

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. पुण्यात रंगणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यातील विजयासह भारतीय संघ मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या सामन्यात दुसऱ्या सामन्यात विजयी मिळवून देणारे अकरा गडी कायम ठेवावेती की काही बदल करावा? हा मोठा प्रश्न कर्णधार विराट कोहलीसमोर असेल.  

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी पृथ्वीला पुन्हा दुखापतीचं 'ग्रहण'

भारतीय संघ व्यवस्थापन पुण्याच्या मैदानात संजू सॅमसन आणि मनिष पांडे यांना सधी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गुवाहाटीच्या मैदानातील सलामीचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर इंदूरच्या मैदानात भारतीय संघाने एकहाती विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. संजू सॅमसन हा भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरतोय. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. ऋषभ पंत ऐवजी संजू सॅमसनला संधी द्यावी, असा सूर देखील यापूर्वी उमटल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र कर्णधार आणि संघ व्यवस्थापन पंतवर मेहरबान असल्यामुळे संजू सॅमसनकडे दुर्लक्षच झाले आहे. 

Cricket Record :यंदा विक्रमादित्याचे हे तीन विक्रम रनमशीनच्या रडारवर

श्रीलंकेला इंदूरमध्ये एकहाती पराभूत केल्यानंतर बाकावर असलेल्या गड्यांची ताकद पाहण्याची टीम इंडियाकडे संधी आहे. मध्यफळीतील फलंदाज मनीष पांडेलाही म्हणावी तेवढी संधी मिळालेली नाही. मागील तीन मालिकेत तो केवळ १ सामना खेळला आहे.  यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ बाकावरच्या गड्यांमधील क्षमतेच्या चाचपणीचा प्रयोग भारतीय संघाला करावा लागणार आहे.

IndvsNZ : टीम इंडियासोबत भिडण्यापूर्वीच न्यूझीलंडला वेदनादायक झटके

पुण्याच्या मैदानातून या प्रयोगाला सुरुवात होणार का? हे पाहावे लागेल. वाशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांना दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी संधी मिळाली. या दोघांनी आपल्यात क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. याशिवाय शिखर धवनच्या कामगिरीकडेही लक्ष्य असेल. अनुभवी धवनने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs sl t20 series To test bench strength or not India face selection dilemma ahead of third T20 against sri lanka