पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: केदार जाधवला सलमान खानने दिली खास भेट

केदार जाधव आणि सलमान खान

टीम इंडियाचा अष्टपैलू केदार जाधव पुण्याचा आहे, हे सर्वांना माहीत आहेच. सध्या टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिकेतील अखेरचा सामनाही पुण्यात होत आहे. यादरम्यान बीसीसीआय टीव्हीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये केदार जाधवचे पुण्यातील संपूर्ण घर दाखवण्यात आले आहे. केदार जाधवने स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून घरातील काही खास ठिकाणांची झलक दाखवली. या व्हिडिओत केदार जाधवने एका खास 'गिफ्ट'ची माहिती दिली. हे 'गिफ्ट' त्याला त्याचा आवडता अभिनेता सलमान खानने दिले आहे.

आता सौरव गांगुलीच्या मोठ्या भावाला बंगालमध्ये मोठे पद मिळणार

सलमान खानचा चाहता असलेला केदार जाधव नेहमी त्याची मिमिक्री करताना दिसतो. इतकेच नव्हे तर टीम इंडियातील काही खेळाडू त्याला 'सल्लू' म्हणून हाकही मारतात. केदार अनेकवेळा सलमान खानच्या शैलीत चालताना दिसतो. या व्हिडिओत केदारने जिममधील एक मोठे साहित्य दाखवले आहे. जिममधील हे साहित्य सलमान खानने आपल्याला भेट दिल्याचे केदारने यावेळी सांगितले. या व्हिडिओत केदारने यासाठी सलमानचे आभारही मानले आणि यावर व्यायाम करतानाही तो दिसला आहे.

Khelo India 2020: सरावा दरम्यान खेळाडूच्या गळ्यात घुसला बाण

केदार जाधव श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघात नाही. परंतु, ऑस्ट्रेलियाविरोधात १४ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे. टी-२० मालिकेतील अखेरचा सामना आज पुण्यात होत आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना १४ जानेवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडिएमवर होणार आहे.

IndvSL T-20 Records : लंकेचा पुण्यातील इतिहास भारी, पण ...

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs sl 3rd t20 match in pune salman khan gifted gym equipment to kedar jadhav watch video here