India vs South Africa, 2nd Test at Pune: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्याच्या मैदानात भारताने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करत मालिका खिशात घातली. या सामन्यात यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने काही अप्रतिम झेल टिपल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर वृद्धिमान साहाच्या यष्टिमागील चपळाईची चर्चा सुरु आहे.
Be strong. Be you. #IndiaVsSouthAfrica pic.twitter.com/iNuDSJCZwg
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) October 13, 2019
INDvsSA : भारताच्या विश्वविक्रमी विजयामागची पाच कारणे
बुमराहच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या ताफ्यात सामील झालेल्या उमेश यादवनेही वृद्धिमान साहाचे कौतुक केले आहे. साहाने घेतलेल्या झेलबद्दल त्याला पार्टी तर द्यावी लागेल, असे उमेश यादवने म्हटले आहे.सामन्यानंतर उमेश यादव म्हणाला की, लेग स्टम्पवर चेंडू टाकून मिळवलेल्या विकेट्समध्ये साहाचे योगदान महत्त्वाचे ठरले. अप्रतिम झेलमुळे त्या माझ्या नव्हे तर साहाने घेतलेले बळी आहेत, असेही यादवने सांगितले. लेग स्टम्पवर टाकलेला चेंडू बॅटची कड घेऊन निश्चितच चौकाराच्या दिशेने जाईल असे वाटले. पण साहाने त्याचे झेलमध्ये रुपांतर केले. यासाठी मला आता वृद्धिभाईला पार्टी द्यावी लागेल.
IND vs SA : पुण्यात भारताचा एक डाव अन् १३७ धावांनी ऐतिहासिक विजय
दुसऱ्या कसोटी सामन्यात साहाने यष्टिमागे कमालीची कामगिरी केली. तिसऱ्या दिवशी आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने थ्यूनिस डी ब्रूनचा पहिल्या स्लिमध्ये अप्रतिम झेल टिपला. तर चौथ्या दिवशी आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात डी ब्रूएन आणि फिलँडरचा अशक्यप्राय झेल घेतल्याचे पाहायला मिळाले.