पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs SA: पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ घोषित, ३ मोठे बदल

टीम इंडिया

टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये बुधवारपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने पहिल्या कसोटीसाठी अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. टीमने दोन मोठे बदल केले आहेत. खराब शॉट खेळत बाद होणाऱ्या ऋषभ पंतला संघात जागा मिळालेली नाही. ऋषभऐवजी वृद्धिमान साहावर यष्टिरक्षणाची जबाबदारी राहिल. आपल्या फॉर्मशी झुंजत असलेल्या लोकेश राहुल ऐवजी संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संधी दिली आहे. 

पंतच्या जागी साहाला का मिळाली संधी, विराटने सांगितले कारण

विंडीज दौऱ्यावर साहा संघाबरोबर बॅकअप यष्टिरक्षक म्हणून होता. पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. गेल्या वर्षी (२०१८) आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे साहाला कसोटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली होती. आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. 

दक्षिण आफ्रिका विरोधातील अध्यक्षीय संघाकडून सराव सामन्यात रोहित शर्मा २ चेंडून ० धावा काढून बाद झाला होता. पण कर्णधार कोहलीने आपल्या या संघ सहकाऱ्यावर विश्वास दर्शवला असून त्याला सलामीला खेळण्याची संधी दिली आहे. कोहलीने नुकताच रोहितची प्रशंसा केली होती आणि नव्या खेळाडुंनाही त्याने सल्ला देण्यास सांगितले होते. 

उसेन बोल्टलाही जमलं नाही ते १० महिन्याच्या लेकराच्या आईनं करुन दाखवलं

आर अश्विनचे पुनरागमन

टीम इंडियाने आणखी एका खेळाडूचा संघात समावेश केला आहे. या खेळाडुला विंडीज दौऱ्यात संधी मिळाली नव्हती. आर अश्विनला रवींद्र जडेजाबरोबर फिरकीपटू म्हणून संधी देण्यात आली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरोधात २०१८ मध्ये आपली अखेरची कसोटी खेळली होती. या कसोटीत त्याने दोन्ही डावांत मिळून ६ विकेट घेतल्या होत्या. जडेजाच्या सध्याच्या चांगल्या कामगिरीमुळे अश्विनला संघात जागा मिळाली नव्हती. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे. 

असा असेल भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, आर अश्विन, आर जडेजा, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs sa team india announced playing xi for first test against south africa at visakhapatnam