पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शतकी खेळीनंतर हिटमॅन रोहितची 'मन की बात'

रोहित शर्मा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कसोटी सलामीवीराच्या 'कसोटी' रोहित शर्माने लिलया पेलली. पहिल्याच दिवशी त्याने नाबाद शतकी खेळी करत विश्वचषकातील आपल्या सातत्यपूर्ण खेळीच्या आठवणींना उजाळा दिला. रोहित टी-२० आणि एकदिवसीय प्रकारात भारतीय संघाचा नियमित सदस्य असला तरी कसोटीत त्याला म्हणावी तशी छाप सोडता आलेली नाही. यापूर्वी जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा तो पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसले. 

आफ्रिकेविरुद्ध त्याला सलामीला संधी देण्यात आली आहे. नैसर्गिक खेळी करत त्याने या संधीचा पूरेपूर फायदा घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा रोहित ११५ धावांवर खेळत होता. सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

र्सी ब्लू असो वा व्हाइट रोहित 'हिट'च : भज्जी

रोहित म्हणाला की, थेट पॅड बांधून मैदानात उतरत डावाला सुरुवात करणे हे मला अधिक आवडते. याचा अर्थ यापूर्वी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी मी इच्छुक नव्हतो असे नाही, असेही त्याने स्पष्ट केले. पण डावाची सुरुवात करणे अधिक आनंददायी असते. सलामीला मैदानात उतरल्यावर अधिक  उत्साह असतो. नव्या चेंडूवर खेळताना गेम प्लॅन आखणे सोपे जाते. सहाव्या क्रमांकावर चेंडू रिव्हर्स स्विंग होत असतो. याशिवाय क्षेत्ररक्षण वेगळे असल्यामुळे चेंडू खेळूनच धावा करण्याचे आव्हान असते. माझ्या खेळ शैलीला डावाची सुरुवात करणे अगदी सुटेबल आहे, असे तो म्हणाला.

गांधी-मंडेला स्मृती चषक : रोहितच्या शतकासह भारताचे नाबाद द्विशतक

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर रोहितने मंयकसोबत पहिल्या विकेटसाठी नाबाद २०२ धावांची भागीदारी रचली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसात जवळपास ३०. ५ षटकांचा खेळ होऊ शकला नाही. रोहित-मंयकच्या जोडगोळीने भारताला भक्कम सुरुवात करुन दिल्याने सलामीच्या लढतीत आफ्रिका पिछाडीवर आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ind vs sa Rohit Sharma says Your mind keeps refreshing during the opening after shines with century in 1st Test as opener