पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जडेजा नर्व्हस नाईंटीजचा शिकार, पण...

रविंद्र जडेजा

India vs South Africa 2nd test match 2019: रविंद्र जडेजाने आपल्या फलंदाजीतील क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या साथीने त्याने भक्कम भागीदारी रचण्यात मोलाचे योगदान  दिले. संघाची धावसंख्या झटपट वाढवण्याच्या नादात तो नर्व्हस नाईंटीजचा शिकार झाला. मुथूस्वामीने त्याला ९१ धावांवर बाद केले. 

INDvsSA 2nd Day Stumps : 'विराट' धावसंख्येसमोर आफ्रिका ३ बाद ३६ धावा

पुण्याच्या मैदानात त्याला अवघ्या ९ धावांनी शतकाने हुलकावणी दिली. जडेजाने १०४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ९१ धावा केल्या. शतक हुकले असले तरी त्याने कर्णधार विराट कोहलीसोबत पाचव्या विकेटसाठी २०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर ६०१ धावांचा डोंगर उभारला आहे.  

पुण्यात रनमशीन बरसली! सचिन, सेहवागचा विक्रम टाकला

रविंद्र जडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पहिलया डावात ३० तर दुसऱ्या धावात ४० धावांचे योगदान दिले होते. शिवाय ६ बळी देखील टिपले होते. दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेच्या पहिल्या डावात चार षटके त्याने निर्धाव टाकली असून गोलंदाजीमध्ये पुन्हा त्याच्याकडून लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा असेल.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ind vs sa ravindra jadeja played brilliant innings against south africa in pune test match