पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जर्सी ब्लू असो वा व्हाइट रोहित 'हिट'च : भज्जी

रोहित शर्मा

विशाखापट्टणमच्या मैदानात रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. कसोटीमध्ये पहिल्यांदाच भारताच्या डावाची सुरुवात करताना रोहितने चौकाराने आपले खाते उघडले. ८४ चेंडूत त्याने अर्धशतक ठोकले. त्यानंतर १५४ व्या चेंडूवर चौकार खेचत त्याने शतक साजरे केले. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा रोहित शर्मा १७४ चेंडूत ११५ धावांवर नाबाद होता. त्याच्या या खेळीत १२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. 

गांधी-मंडेला स्मृती चषक : रोहितच्या शतकासह भारताचे नाबाद द्विशतक

या दमदार शतकी खेळीनंतर रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. अनेक दिग्गज क्रिकेटर्संनी ट्विटरच्या माध्यमातून रोहितच्या खेळीचे कौतुक केले आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने रोहित तिन्ही प्रकारामधील परफेक्टनिस्ट असल्याच्या आशयाचे ट्विट केले. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, ब्लू जर्सी असो किंवा व्हाइट याचा काही फरक पडत नाही. कोणत्याही जर्सीत रोहित 'हिट' आहे.

कसोटी कारकिर्दीतील चौथे आणि सलामीवीर म्हणून पहिल्या शतक ठोकत रोहितने संधीच सोनं केल, असे माजी क्रिकेटर आणि क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे. रोहितचा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील सहकारी सूर्यकुमार यादवने रोहितच्या शतकावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतके ठोकण्याची रोहितला सवय जडल्याचे उल्लेख त्याने आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs sa india vs south africa test series 1st test day 1 cricketer react after rohit sharma