पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvSA: दुसरी कसोटी पुण्यात, पण पाण्यात तर नाही ना जाणार?

पुण्यातील गहुंजेच्या मैदानात रंगणार सामना

पाहुण्या आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळव भारतीय सघाने दमदार सुरुवात केली आहे. या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील गहुंजेच्या मैदानात रंगणार आहे. 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे.

'शरद पवारांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार'

सामन्याच्या दरम्यान पुण्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशाखापट्टणमच्या पहिल्या सामन्यावेळी देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सामना निकाली निघाल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी देखील क्रिकेट चाहत्यांना हिच पुनरावृत्ती पाहण्याची इच्छा असेल.

पुण्यात अतिवृष्टीचा इशारा

पीबल्स, मेयर आणि क्वेलोज यांना यंदाचा भौतिक शास्त्राचा नोबेल

पुणे हवामान खात्याच्या अंदाजानुसार 10 ते 13 ऑक्टोबर दुपारच्या दरम्यान अतिवृष्टिचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या वातावणर सामन्यासाठी अनुकूल वाटत आहे. मात्र पुढील पाच दिवसांत पाऊस आपले तेवर दाखवू शकतो. यंदाच्या मान्सून हंगामात पावसाने पुण्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते.

काँग्रेस निवडणूक जिंकण्याची शक्यता कमीच, सलमान खुर्शीद यांचे वक्तव्य

दोन्ही संघ कसोटी सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी 9 ऑक्टोबर सराव करणे अपेक्षित आहे. मात्र पाऊस सराव सामन्यात बेरंग करु शकतो. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा, मयंक अग्रवाल यांच्या दमदार खेळीनंतर गोलंदाजीत पहिल्या डावात आर अश्विन आणि दुसऱ्या डावात मोहम्मद शमी आणि जडेजाने आफ्रिकेला घायाळ केले होते.  

नोकऱ्या जाताहेत, उद्योग बंद पडताहेत हे स्वीकारा- उद्धव ठाकरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs sa india vs south africa 2nd test match weather forecast of pune rain chances in pune