पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA : आफ्रिकेसह भारतासमोरही प्लेइंग इलेव्हनची 'कसोटी'

भारत आणि दक्षिण आफ्रिका

India vs South Africa 3rd Test Match Ranchi: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात दोन्ही संघासमोर संघ निवडीची डोकेदुखी असेल. १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान रांचीच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. घरच्या मैदानात सातत्यपूर्ण ११ विजयासह विश्वविक्रम रचणारा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्विप देत आणखी एका ऐतिहासिक कामगिरीसाठी उत्सुक असेल. 

INDvsSA : फाटक्या नशीबाच्या कर्णधाराला टॉसची चिंता

रांचीच्या मैदानात तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरायचे की अगाऊ फलंदाजाला संधी द्यायची हा मुद्दा भारतीय संघासाठी डोकेदुखीचचा असेल. उमेश यादवने पुण्याच्या मैदानात चांगली कामगिरी केली. पण तिसऱ्या कसोटीत त्याच्याऐवजी कुलदीपला संधी मिळू शकते. विंडीज दौऱ्यावर दमदार कामगिरी करणाऱ्या हनुमा विहारीला मागील सामन्यात बाकावर बसवण्यात आले होते. त्याला खेळवण्यासंदर्भातही संघ व्यवस्थापन विचार करेल. मात्र रांचीतील सामन्यापूर्वी कुलदीप यादवने गोलंदाजी आणि फलंदाजीचा नेटमध्ये कसून सराव केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे विहारीऐवजी त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. 

मेरी कोमशी लढू द्या! भारतीय महिला बॉक्सरचे क्रीडा मंत्र्यांना पत्र

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. पुण्यातील सामन्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर एडेन मार्करम तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्याऐवजी हेन्रीक क्लासेन कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. याशिवाय केशव महाराजच्या जागी डेन पीटला संधी मिळू शकते.  

भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, वृद्धिमान साहा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

दक्षिण अफ्रि संभाव्य संघ : डिन एल्गर, टेम्बा बव्हुमा, थ्युयिनिस डी ब्रुएन, फाफ डु प्लेसी, हेन्रिक क्लासेन, आनरिख नॉर्खिआ, क्विंटन डी कॉक, मुथुस्वामी, वर्नन फिलँडर, डेन पीट, कगिसो रबाडा.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs sa 3rd test match india vs south africa india dream11 south africa dream11 virat kohli kuldeep yadav