पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA : चाहत्यामुळे रोहितची तारांबळ, पुण्याच्या मैदानातील प्रकार

रोहित शर्मा

India vs South Africa 2nd Test Match Day 3 Rohit Sharma: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना  पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारताने आफ्रिकेचा पहिला डाव २७५ धावांत गुंडाळत ३२६ धावांच्या आघाडीसह सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. 

INDvsSA Day 3 Stumps: फिलँडर-महाराज जोडीनं दमवलं!

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक क्रिकेट चाहता सुरक्षाकडे तोडून मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. मैदानात घुसल्यानंतर हा चाहता रोहित शर्माच्या पायात पडल्याचे पाहायला मिळाले. चाहत्याला रोखत असताना रोहितही मैदानात पडल्याचे पाहायला मिळाले. सुरक्षा रक्षकांनी तातडीने मैदानात येत या चाहत्याला बाहेर काढले. रोहित आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये घडलेला अनोखा क्षण पाहून अजिंक्य रहाणेलाही हसू आवरले नाही. 

टीम इंडियाने महाराजला चांगलेच धुतले!

सुरक्षा कवच तोडून अचानक मैदानात घुसलेला चाहता थेट स्लीममध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या रोहित शर्माच्या दिशेने आला. रोहितसा नमस्कार करण्याच्या उद्देशाने हा चाहता त्याच्या पायात पडला. त्याला रोखताना रोहितची चांगलीच गंमत झाली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत क्रिकेट चाहता मैदानात घुसण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी विशाखापट्टणमच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीशी हस्तांदोलन करण्यासाठी एक चाहता मैदानात आल्याचे पाहायला मिळाले होते. तर मोहालीतील टी-२० सामन्यातही काहीसा असाच प्रकार पाहायला मिळाला होता.  

rohit sharma

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ind vs sa 2nd test match day 3 Fan invades pitch to touch Rohit Sharma s feet see photos