पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोहलीच्या 'विराट' विक्रमानंतर आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया

शाहिद आफ्रिदी-विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात दमदार अर्धशत झळकावले. ७२ धावांच्या नाबाद खेळीमुळे विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात विराट कोहलीने हिटमॅन रोहित शर्माचे दोन विक्रम मागे टाकले.  

नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विराटने रोहितचे दोन विक्रम टाकले मागे

कोहलीच्या 'विराट' कामगिरीचे पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदीने कौतुक केले आहे. टी-२० सामन्यात सर्वाधिक अर्धशतके आणि सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमानंतर आयसीसीने विराट कोहलीचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. या ट्विटवर शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे. या कामगिरीबद्दल अभिनंदन विराट कोहली! तू एक सर्वोत्तम खेळाडू आहेस. आपल्या बहरदार खेळीनं क्रिकेट चाहत्यांचे असेच मनोरंजन करत रहा!, असे आफ्रिदीने म्हटले आहे.  

IND vs SA T20 : भारताचा आफ्रिकेवर एकतर्फी विजय

मोहालीच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेले आव्हान १ षटक राखून पार केले. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद ७२ धावांची खेळी केली होती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ind vs sa 2nd t20i India vs South Africa Shahid Afridi reacts to ICC s congratulatory tweet for Virat Kohli after 2nd T20I at Mohali