पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिक पांड्या बाहेर

हार्दिक पांड्या

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे न्यूजीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे हार्दिक यापूर्वीच भारत अ संघातून बाहेर झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. आता तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला कसोटीत संधी मिळणार नाही. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान या महिन्याच्या अखेरीस २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

Budget 2020 : ग्रामीण आणि शहरी भारताला जोडणारा अर्थसंकल्प

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनी यांनीही हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत वक्तव्य केले होते. हार्दिकची तंदुरुस्ती देशांतर्गत क्रिकेटसाठीही योग्य नसल्याची म्हटले होते. 

ते म्हणाले होतो की, हार्दिक आता देशांतर्गत क्रिकेटसाठीही तंदुरुस्त नाही. बडोद्याचा हा अष्टपैलू बेंगळुरु राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यासाठी निवडण्यात आले नाही. 

'केंद्र सरकार शाहिन बाग आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार'

हार्दिक पांड्या आता आयपीएलच्या मैदानावरच पुनरागमन करेल असे बोलले जात आहे. हार्दिक पांड्या सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता. त्याने अंतिम वनडे वर्ल्ड २०१९ मध्ये खेळला होता.