पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाबाद शतकी खेळीसह अजिंक्य कसोटीसाठी सज्ज

अजिंक्य रहाणे

भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' संघातील चार दिवसीय अनाधिकृत सामना सोमवारी अनिर्णित अवस्थेत सुटला. या सामन्यातून भारतीय संघातील फलंदाज न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी सज्ज असल्याचे संकेत मिळाले. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात शतकी खेळी केली. एवढेच नाही तर तो नाबद राहिला. ही खेळी त्याच्यासाठी आगामी मालिकेसाठी आत्मविश्वास उंचावणारी ठरेल. 
न्यूझीलंड अ विरुद्ध रंगलेल्या सामन्यातील पहिल्या डावात भारत अ संघाने  ५ बाद ४६७ धावा केल्या होत्या. यात शुभमन गील १३६, पुजारा ५३, हनुमा विहारी ५९. विजय शंकर ६६ आणि अजिंक्य रहाणेनं १०१ धावांची नाबाद खेळी साकारली.

आयसीसीसमोर दोषी कोण ठरणार? बांगलादेशी की...

तत्पूर्वी न्यूझीलंड अ संघाने पहिल्या डाव ९ बाद ३८६ धावांवर घोषीत केला होता. यजमान संघाकडून डेरिल मिशेल २२२ चेंडूमध्ये १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०३ धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. त्याच्याशिवाय   ग्लेन फिलिप्सने ६५, डेन क्लीवरने ५३, कर्णधार हमीश रदरफोर्डने ४० आणि टिम सीफर्टने ३० धावा केल्या होत्या. भारत अ संघाकडून मोहम्मद सिराज, संदीप वॉरियर, रविंचंद्रन अश्विन आवेश खान यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले तर  शाहबाज नदीम याला एक बळी मिळवण्यात यश मिळाले.  भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाअखेर शुभमन गिल नाबाद १०७ आणि हनुमा विरारी आणि पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर १ बाद २३४ धावा केल्या होत्या.

Video U-19 WC : फायनलमध्ये 'जंटलमन गेम' बदनाम!

चौथ्या आणि अखेरच्या दिवशी गिल आणि पुजाराने भारताच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर २५० धावा असताना पुजाराच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. त्याने ९९ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर शुभमन गिलच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला. गिलने १९० चेडूत १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १३६ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने विजय शंकरच्या साथीनं भारताचा डाव ४०० पार नेला. धावफलकावर ४०८ धावा असताना विजय शंकर बाद झाला. केएस भरत २२ धावा करुन बाद झाला. तर अजिक्य रहाणे १४८ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकारासह १०१ धावांवर नाबाद परतला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ind vs nz n unofficial test ajinkya rahane scores unbeaten century in drawn game against new zealand a