पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीला ७ व्या क्रमांकावर का पाठवलं?, शास्त्रींनी सोडलं मौन

रवी शास्त्री आणि महेंद्रसिंह धोनी

आयसीसी विश्वचषक २०१९ च्या पहिला सेमीफायनलमध्ये १० जुलै रोजी टीम इंडियाचा न्यूझीलंडने १८ धावांनी पराभव केला होता. या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवले, असा प्रश्न उपस्थितीत केला गेला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी आता याबाबत मौन सोडले आहे. 

धोनीच्या निवृत्तीवर मॅग्राची 'मन की बात'

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, सुनील गावसकरसारख्या दिग्गजांनी या निर्णयासाठी संघ व्यस्थापनावर प्रश्न उपस्थितीत केले होते. 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना शास्त्री म्हणाले की, हा संघाचा निर्णय होता. या निर्णयात सर्वांचा सहभाग होता. हा खूप सामान्य सामना होता. धोनी लवकर फलंदाजीला यावा आणि तो बाद होऊन परत जावा, ही गोष्ट सामन्यात कोणालाच नको होती. असे झाले असते तर आम्ही लक्ष्यापासून भरकटलो असतो. आम्हाला नंतर त्याच्या अनुभवाची गरज होती. तो ऑल टाइम बेस्ट फिनिशर आहे. त्याला फलंदाजीत वर पाठवणे एखाद्या गुन्ह्यापेक्षा कमी नव्हते. संघातील सर्व लोक हे जाणून होते. 

वी शास्त्रींनी चाहत्यांना दाखवली धोनीची जर्सी

सेमीफायनलमध्ये धोनीच्या वर ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकला पाठवले. सामन्यात धोनी दुर्देवीरित्या धावबाद झाला आणि भारताने हा सामना १८ धावांनी गमावला. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात कर्णधार विराट कोहली रागात रवी शास्त्री यांच्याजवळ गेला होता. धोनीला खालच्या क्रमांकावर पाठवण्याच्या कारणावरुन विराट भडकला होता, असे म्हटले जात होते.

बड्या मोहिमेला जाण्यापूर्वी शास्त्री धोनीबद्दलही भरभरुन बोलले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs nz ICC World Cup 2019 India vs New Zealand Why was MS Dhoni sent at No 7 in semi final here is the answer