पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvsNZ: वर्ल्ड चॅम्पियनसाठी या पाच गोष्टींवर चिंतन करावेच लागेल

टीम इंडियासमोरही चॅलेंज

मँचेस्टरच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. साखळी सामन्यातील आपली कामगिरी कायम ठेवत नॉक राउंडमधील सामन्यात विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला काही उणीवा भरुन काढाव्या लागतील. 

#विराटच्या शतकाची प्रतिक्षा कधी संपणार
यंदाच्या विश्वचषकात भारतीय कर्णधार आणि क्रिकेट जगतातील रनमशिन फॉर्ममध्ये तर दिसतोय. पण मोठी खेळी करण्यात त्याला यश मिळाले नाही. परिणामी आठ सामन्यानंतर विराटच्या नावे एकाही शतकाची नोंद झालेली नाही. उर्वरित दोन सामन्यात अर्धशतकीय खेळीला त्याला शतकात रुपांतर करावे लागेल. याशिवाय चुकीच्या क्षणी विकेट टाकण्यापासूनही त्याला सावध रहावे लागेल. विराटची विकेट ही प्रतिस्पर्धी संघासाठी मोठा जॅकपॉट असतो. ही संधी त्याने प्रतिस्पर्ध्याला देऊ नये.  

#मध्यफळीतील निराशा पूर्णविराम द्यावा लागेल
भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धचा सामना वगळता प्रत्येक सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. पण यात सर्वात मोठे योगदान हे सलामीची जोडी अन् विराट कोहली यांचे आहे. मध्यफळीतील फलंदाजांनी नावाला साजेसा खेळ केलेला नाही. उर्वरित सामन्यात ही चूक भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरु शकते. मध्यफळीतील फलंदाजांनी अखेरच्या षटकात जलदगतीने धावसंख्या वाढवणे अपेक्षित आहे.  

मलिंगाबरोबर आणि विरोधात खेळणं अभिमानास्पदः बुमराह

#केदार, कार्तिक की जडेजा 
महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इलेव्हनमध्ये केदार, कार्तिक आणि जडेजा यापैकी कोणाला संधी द्यावी, हा देखील विराट कोहलीसमोर मोठा प्रश्न असेल. केदार जाधवने ५ डावात केवळ ८० धावा केल्या आहेत. कार्तिकने १ डावात ८ धावा केल्या. जडेजाला ज्या सामन्यात संधी मिळाली त्या सामन्यात त्याच्यावर फलंदाजी करण्याची वेळच आली नाही. यांच्यामधील मध्यफळीची जबाबदारी कोणावर द्यावी, हा मोठा तिढा आहे. संघ व्यवस्थापन आणि कोहली यावर काय मार्ग काढणार यावरही भारताची कामगिरी अवलंबून असेल.  

#चौथ्या क्रमांकाला धोनी की पंत 
आपला अखेरचा विश्वचषक खेळणाऱ्या अनुभवी महेंद्रसिंह धोनीवर धीम्या खेळीमुळे टीका झाली आहे. या परिस्थितीत धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळवून पंतला सहाव्या क्रमांकावर पाठवावे, अशी प्रतिक्रिया माजी दिग्गजांनी व्यक्त केली आहे. चौथ्या क्रमांकावर धोनीने धीमा खेळ करत डाव सावरणे योग्य ठरेल. याउलट अखेरच्या षटकात पंतची फटकेबाजी भारतासाठी उपयुक्त ठरेल. 

#शमीला संधी मिळणार की भुवीवर विश्वास दाखवायचा हा मोठा तिढा
गोलंदाजीच्या ताफ्यात मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यापैकी कोणाला संधी द्यावी, ही मोठी डोकेदुखी असेल. दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन केलेल्या भुवी आपली छाप उमटवण्यास अपयशी ठरलाय. त्याने ५ सामन्यात केवळ ७ बळी मिळवले आहेत तर दुसरीकडे त्याच्या जागी मिळालेल्या संधीचं मोहम्मद शमीनं सोन करुन दाखवलं. शमीने ४ सामन्यात एका हॅटट्रिकसह १४ बळी मिळवले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शमीला विश्रांती देण्यात आली होती. आत उपांत्य सामन्यात कोणाला संधी द्यावी, हा तिढा कोहली अँण्ड कंपनीला सोडवावा लागणार आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ind vs nz icc world cup 2019 india vs new zealand india must work on these five weaknesses before semi final clash