पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND: कोहलीच्या या निर्णयावर भज्जीही संतापला

विराट कोहली

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यासोबतच त्याने जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला संघातून वगळ्याचा निर्णय कोहलीने घेतला. मालिकेतील महत्त्वपूर्ण सामन्यातून शमीला बाकावर बसवल्याने सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. बऱ्याच क्रिकेट प्रेमींना हा निर्णय रुचलेला नाही, असे प्रतिक्रियावरुन दिसून येते. 

NZvs IND 2nd ODI: भारत-न्यूझीलंड सामन्याचे अपडेट्स

नाणेफेकीनंतर कोहलीने आपल्या बाजूने शमीला बाकावर बसवण्याच्या स्पष्टीकरण दिले आहे. आगामी कसोटी मालिका लक्षात घेऊन शमीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचे तो म्हणाला. मालिकेतील महत्त्वाच्या सामन्यात कोहलीने घेतलेला या निर्णयावर दिग्गजांनीही प्रश्नचिन्ही उपस्थित केले आहे.  

भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करणारा माजी क्रिकेटर हरभजनने विराटचा निर्णय पटणारा नाही असे म्हटले आहे. कसोटी मालिकेला अद्याप १२ दिवसांहून अधिक काळ आहे. हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अशा परिस्थितीत शमीला बाहेर ठेवणे परवडणारे नाही. जसप्रित बुमराह देखील कसोटी खेळणार आहे. मग त्याला का विश्रांती दिली नाही?  असा प्रश्न उपस्थित करत हरभजनने कर्णधार विराट कोहलीची फिरकी घेतलीय.  

NZvsIND: ६ फूट ८ इंच उंचीचा काइल जेमीसन भारताविरोधात करणार पदार्पण

पाच सामन्यांची टी-२० मालिका निर्विवादपणे जिंकल्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत न्यूझीलंड १-० अशा आघाडीवर असून दुसरा सामना गमावला तर भारतीय संघावर मालिका गमावण्याची नामुष्की ओढावू शकते. त्यामुळेच शमीला विश्रांती देऊन कोहलीने मोठी चूक केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.