पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्यूझीलंडमध्ये विराटचं सेल्फी प्रेम,शार्दुल-श्रेयस जोडीही 'फ्रेम'मध्ये

विराट कोहली

भारतीय संघ दोन महिन्यांच्या मोठ्या दौऱ्यासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. व्हाया सिंगापूर ऑकलंडमध्ये दाखल झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने एक सेल्फी शेअर करत न्यूझीलंडमध्ये पोहचल्याची माहिती दिली आहे. विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये शार्दुल ठाकूर आणि श्रेयय अय्यर ही युवा जोडीही दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Touchdown Auckland. Let’s go 🇮🇳 @shardul_thakur @shreyas41

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

Video :धडपडत धाव पूर्ण केली, पण रिटायर हर्ट होऊन रुग्णालयात पोहचला

२४ जानेवारीला ऑकलंडच्या मैदानातून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेने भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह दोन सामन्यांच्या कसोटी मालिका ही खेळणार आहे. टी-२० मालिका ही ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी विश्वचषकाच्या दृष्टिने तर कसोटी मालिका ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण ठरेल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत आतापर्यंत टीम इंडियाने ७ कसोटी सामने खेळले असून सर्व सामन्यात विजयी नोंदवला आहे.

गंभीर स्ट्रोक : हा बॅकअप मॅन पंतचं पॅकअप करु शकतो

मात्र न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर कसोटी मालिका जिंकणे सहज आणि सोपे असणार नाही. उसळत्या खेळपट्टीवर न्यूझीलंडचे गोलंदाज टीम इंडियाला नाचवणार की विराट सेना न्यूझीलंडमध्येही विजयी भांगडा करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने हे ऑकलंडच्या ईडन पार्कच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील तिसरा सामना हा हेमिल्टन, चौथा वेलिंग्टन तर अखेरचा टी-२० सामना मॉन्गनुई येथे रंगणार आहे. 

Under-19 World Cup : स्पर्धेत निच्चांकी धावसंख्येसह लाजिरवाणा विक्रम
वेळापत्रक
T20 मालिका

२४ जानेवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, T20I(ऑकलंड)
२६ जानेवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड,  T20I(ऑकलंड)
२९ जानेवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, T20I(हेमिल्टन)
३१ जानेवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, T20I(वेलिंग्टन)
२ फेब्रुवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, T20I(मॉन्गनुई)

एकदिवसीय मालिका
५ फेब्रुवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड,  वनडे (हेमिल्टन)
८ फेब्रुवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड,  वनडे (ऑकलंड)
११ फेब्रुवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड,  वनडे (मॉन्गनुई)

कसोटी मालिका
२१ ते २५ फेब्रुवारी, भारत विरुद्ध न्यूझीलंड, टेस्ट(वेलिंग्टन)
२९ फेब्रुवारी ते ४ मार्च, भारत विरुद्ध न्यूझीलंड, टेस्ट(क्राइस्टचर्च)

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ind vs nz 2020 india vs new zealand t20 odi and test series full schedule indian team reached auckland virat kohli shared selfie with shardul thakur and shreyas iyer