भारतीय संघाचा सलामीवीर आणि कार्यवाहू कर्णधार रोहित शर्मा बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरला. मात्र या सामन्यात मैदानात उतरताच त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्याच्या बाबतीत धोनीला, तर सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराटला मागे टाकले.
INDvs BAN 1st T20I : भारत- बांगलादेश सामन्याचे संपूर्ण अपडेट्स
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात उतरताच रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याचा हा ९९ वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावे होता. धोनीने भारताकडून ९८ टी-२० सामने खेळले आहेत. जागितक क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावे सर्वाधिक सामन्यांचा विक्रम आहे. त्याने १११ सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर रोहित शर्मा ९९ सामन्यांसह शाहिद आफ्रिदीसोबत संयुक्त स्थानावर आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो आफ्रिदीलाही मागे टाकेल.
पहिल्या दिवस-रात्र कसोटीचे पेस-गोपीचंद-सानियाला निमंत्रण
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सहा चेंडूंत नऊ धावांची खेळी करून रोहितने टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत पुन्हा अव्वलस्थान गाठले. विराटने ७२ सामन्यांत २ हजार ४५० धावा केल्या आहेत. तर रोहितनं ९९ सामन्यांत २ हजार ४५२ धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर २२ अर्धशतके आहेत. तर रोहितच्या खात्यात ४ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे.