पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंक बॉलवर खेळणे सोपे नसेल : अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे

भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने मालिकेसाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. कोलकातामध्ये होणाऱ्या ऐतिहासिक दिवस-रात्र सामन्याची उत्सुकता निश्चतच आहे. पण आता आम्ही इंदुरच्या कसोटीवर लक्ष्य केंद्रीत करत आहोत. 

डेव्हिस चषक : भारताच्या भूमिकेनंतर फायनल निर्णय

यावेळी त्याने दिवस-रात्रीच्या सामन्यात गुलाबी चेंडूवर खेळणे सोपे नाही, असेही म्हटले आहे. लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडूवर अधिक नियंत्रित आणि संयमी खेळावे लागेल. शरिरापासून दूर खेळणे फलंदाजाला महागात पडू शकते, असे अजिंक्यने सांगितले. २२ नोब्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य रहाणेंसह चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांनी गुलाबी चेंडूवरील सराव सत्रात भाग घेतला होता.

नेट प्रॅक्टिसपूर्वी कोहलीची गल्लीत फटकेबाजी

बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्यांनी राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव केला. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रहणे म्हणाले की,  आम्ही चार सराव सत्रात भाग घेतला. यातील दोन सत्रात आम्ही गुलाबी चेंडूवर सराव केला तर दोन सत्रातील सराव लाल चेंडूवर केल्याचे अजिंक्य रहाणेने सांगितले. मी पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर खेळलो. स्विंग आणि स्विमवर लक्षकेंद्रीत करावे लागेल, असेही अजिंक्यने म्हटले आहे.