पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs BAN: दुसऱ्या सामन्यावर वादळी संकट

टी-२० मालिकेत पाहुण्या बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली आहे.

दिल्लीत प्रदूषणाचा हाहाकार माजला असताना भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडला. या सामन्यात पाहुण्या बांगलादेशने ऐतिहासिक विजय नोंदवत रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला शह दिला. अरुण जेटली आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मिळालेल्या पराभवाचा बदला घेत सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राजकोटमधील सामन्यात भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. 

ICC T20 WC: नव्या पद्धतीने रंगणार सामने, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

मात्र, दुसऱ्या टी-२० सामन्यावर 'महा' वादळाचे संकट घोंगावत आहे. स्थानिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार 'महा' वादळ बुधवारी रात्री किंवा गुरुवारी सकाळी दीव आणि द्वारका किनाऱ्याला धडकणार आहे. यावेळी १२० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या वादळामुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये ६ आणि ७ नोव्हेंबरला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.  

IND vs BAN: भारताचा विक्रम दूषित, बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

दुसरा टी-२० सामना गुरुवारी राजकोटच्या मैदानात नियोजित आहे. वादळी वारा आणि पाऊस दुसऱ्या टी-२० च्या खेळात व्यत्यय आणणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सामना रद्द झाला तर भारतीय संघाचे मालिका विजयाचे स्वप्न भंग होईल. तसेच बांगलादेशला मालिका पराभूत होण्याचे संकट टळेल. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना १० नोव्हेंबरला नागपूरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Ind vs Ban 2nd T20 International India vs Bangladesh After Delhi pollution cyclone Maha could disrupt 2nd T20I