पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कांगारुंच्या शिकारीसाठी या ११ वाघांना मिळू शकते संधी

टीम इंडिया पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल

India vs Australia, 1st ODI at Mumbai: मायदेशातील श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत एकहाती वर्चस्व मिळवल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेला मुंबईतील सामन्याने सुरुवात होणार आहे. मागील एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे या मालिकेत पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.  

कोहली लय भारी! स्मिथची त्याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही :गंभीर

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियात ऑस्ट्रेलियाला थोपवण्याची  क्षमता निश्चित आहे. पण यावेळी भारत दौऱ्यावर आलेला ऑस्ट्रेलियन संघ मागील वेळेपेक्षाही अधिक ताकदीनीशी आला आहे. यासाठी भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनची योग्य निवड करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून सलामीवीर रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करत आहेत. रोहित शर्मा आणि शिखर धवन भारताच्या डावाला सुरुवात करण्याची शक्यता आहे.  केएल राहुलने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ६१.६७ च्या सरासरीने १८५ धावा केल्या असल्या तरी एकदिवसीय सामन्यात सलामीची संधी ही धवनलाच मिळू शकते.  

क्रिकेटच्या देवाला दिली कृष्णाची उपमा, कैफ म्हणाला फिलिंग लाइक सुदामा

कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ९ सामन्यात त्याने ४९.३३ च्या सरासरीनं ४४४ धावा केल्या आहेत. त्याच्या कामगिरीवर भारतचा मालिकेतील दबदबा अवलंबून असेल.  युवा फलंदाज श्रेयस अय्यर, ऋषभ पंत यांच्यासाठी ही मालिका आणखी एक परीक्षा आहे. या दोघांशिवाय केदार जाधवला संधी मिळू शकते. विंडीज दौऱ्यावर केदार जाधव फारशी प्रभावी कामगिरी करु शकला नव्हता. त्याच्या अष्टपैलू कामगिरी करण्याची क्षमता असल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यालाही संघात स्थान मिळू शकेल. रविंद्र जडेजा सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत असल्यामुळे अष्टपैलूच्या रुपात त्याची संघात वर्णी निश्चित मानली जात आहे. 

टी-२० वर्ल्ड कपसाठी महिला ब्रिगेडची घोषणा, १५ वर्षाच्या मुलीलाही संधी

गोलंदाजीमध्ये शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह भारतीय संघाच्या ताफ्यात असू शकतात. मोहम्मद शमी आण बुमराह या प्रमुख गोलंदाजांवर फिंच-वॉर्नर जोडीला लवकर गुंडाळण्याचे आव्हान असेल. त्यांना इतर गोलंदाज कशा पद्धतीने साथ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

भारतीय टीम इलेव्हन : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केदार जाधव, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs australia 1st odi match india dream11 india vs australia at mumbai team india predicted playing xi rohit sharma mohammed shami rishabh pant shardul thakur at wankhede cricket stadium