पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvAUS: ऋषभ पंत ऐवजी 'या' विकेटकीपरची टीम इंडियात निवड

के एस भरत

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या दुसऱ्या वनडेसाठी विकेटकीपर फलंदाज के एस भरतला बोलावण्यात आले आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत पहिल्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात जायबंदी झाला होता. फलंदाजी करताना पंतच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्याला विकेटकीपिंगही करता आले नव्हते. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मालिकेतील दुसरा सामना आज राजकोट येथे खेळवला जात आहे. 

सचिन नव्हे धोनी क्रिकेटमधील देव! ट्विटरवर #ThankYouDhoni ट्रेंड

भारतासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. मालिकेत ०-१ ने मागे असलेल्या टीम इंडियाला या सामन्यात कोणत्याही स्थितीत पुनरागमन करावे लागणार आहे. सुरुवातीला बीसीसीआयने बंगळुरु येथील तिसऱ्या वनडेपर्यंत पंत तंदूरुस्त होईल असे म्हणत त्याच्या जागी कोणालाही संघात घेणार नसल्याचे म्हटले होते. सध्या पंत बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अ‍ॅकडमीच्या (एनसीए) पुनर्वसन केंद्रात आहे. अखेरचा वनडे सामना १९ जानेवारी रोजी बंगळुरुला होणार आहे. 

ब्लॉग: फिलिंग धोनी तेव्हाच आउट झालाय, जेव्हा तो धावबाद झाला!

'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार के एस भरतला संघात घेण्याचा निर्णय खूप उशिराने घेण्यात आला. त्याला जेव्हा राजकोटला येण्यास सांगितले तेव्हा तो तो हैदराबादमध्ये होता. भरतच्या विकेटकीपिंगच्या शैलीचे यापूर्वी मोठे कौतुक झालेले आहे. संजू सॅमसन आणि इशान किशन सध्या न्यूझीलंडमध्ये आहेत. दोघेही भारत अ संघात सामील आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs aus odi series india vs australia 2nd odi at rajkot india have called up Andhra Pradesh wicketkeeper batsman KS Bharat as cover for the injured Rishabh Pant