पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsAUS : सचिन-विराटला मागे टाकत रोहितची विश्वविक्रमाला गवसणी

रोहित शर्माची विश्वविक्रमाला गवसणी

भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला वानखेडेच्या मैदानावर हिट शो दाखवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कने १० धावांवर खेळणाऱ्या रोहित शर्माला वॉर्नरकरवी झेलबाद केले. कॅलेंडर इयरमधील पहिल्याच सामन्यातील फ्लॉप शोनंतरही रोहित शर्माने अल्प धाव करुन विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर सर्वाधिक जलदगतीने हजारीचा टप्पा पार करण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विद्यमान कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मागे टाकलाय. 

ऑस्ट्रेलियात आग ओकणाऱ्या हिटमॅनचा घरच्या मैदानावर 'फ्लॉप शो'

क्रिकेट जगतामध्ये केवळ चार फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना हजारीचा टप्पा पार केला आहे. यात तीन भारतीय फलंदाज असून चौथा फलंदाज हा इंग्लंडचा आहे. रोहित शर्माने अवघ्या १८ डावांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हजारीचा टप्पा पार केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी हजारीचा टप्पा पार करण्यासाठी १९ डाव खेळावे लागले होते.  इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने घरच्या मैदानावर हजारीचा टप्पा पार करण्यासाठी २५ वेळा फलंदाजी करावी लागली होती.  

INDvsAUS Updates : पहिल्या एकदिवसीय सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. सचिनने ३० डावात १ हजार ५६१ धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ इयोन मॉर्नगचा क्रमांक लागतो. मॉर्गनने ३१ डावात १ हजार २४७ धावा केल्या आहेत. विराट कोहली २० डावात १ हजार ३२ धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नावे १८ डावात १ हजार धावा केल्या आहेत.  भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात खेळताना २६ डावात ९२६ धावा केल्या आहेत.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ind vs aus 1st odi match Rohit Sharma has completed 1000 Runs against Australia at Home virat kohli sachin tendulkar india vs australia Word Record