तिरुवनंतपुरमच्या मैदानात शिवम दुबेने आपल्यातील झंझावात दाखवून दिला. लोकेश राहुलच्या रुपात भारतीय संघाला पहिला धक्का बसल्यानंतर अनपेक्षितपणे कर्णधार विराट कोहलीने डावखुऱ्या शुभम दुबेला आपल्या जागी फलंदाजीला पाठवूत बढती दिली. मैदानात उतरुन शिवमनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावत विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यात त्याने ३० चेंडूत ५४ धावांची धमाकेदार खेळी केली. यात ३ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.
NDvsWI: तिरुवनंतपुरम एयरपोर्टवर संजूचं खास स्वागत, पाहा व्हिडिओ
भारतीय डावातील ९ षटकात पोलार्डच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने सलग तीन षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. शिवम दुबे २०१८ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये एका षटकात पाच षटकार मारल्यामुळे चर्चेत आला होता. आजच्या सामन्यात त्याने आपली तिच झलक दाखवून दिली. भारतीय संघाकडून पाच सामन्यातील चौथ्या डावात शिवम दुबेने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिले अर्धशत झळकावले. त्याच्या धमाकेदार खेळीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होताना दिसत आहे.
आलम 'पनाह' ३४ वर्षांचा गडी १० वर्षानंतर पाकच्या राष्ट्रीय संघात
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १६ सामन्यात हजाराहून अधिक धावा आणि ४० बळी मिळवण्याचा पराक्रम शिवमच्या नावे आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ३५ सामन्यात त्याने ६१४ धावा आणि ३४ बळी मिळवले आहेत. अष्टपैलू शिवम दुबे फलंदाजीनंतर गोलंदाजीत कशी कामगिरी करतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.