कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खेळाची मैदाने ओस पडली आहेत. कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यामुळे सामान्य व्यक्तींपासून ते लोकप्रिय खेळाडू सर्वजण आपापल्या घरामध्ये कैद आहेत. मैदानातील स्पर्धा रद्द झाल्यानंतर मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीमध्ये क्रिकेटर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.
भारत-पाक यांच्यातील मालिकेवर दिग्गज क्रिकेटरची तिखट प्रतिक्रिया
मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू इन्टाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आपल्या टीममधील सहकाऱ्यांबद्दलच्या काही गोष्टी शेअर करताना पाहायला मिळाले. यामध्ये रोहित शर्मा सर्वाधिक सक्रीय आहे. रोहितने आतापर्यंत युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि युवराज सिंह यांच्याशी लाइव्ह चॅट केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर तो आता नव्या गेस्टसह पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झालाय.
कोविड -१९: मदत निधीसाठी भारत-पाक यांच्यात मालिका खेळवावी : अख्तर
युवराजसोबतच्या चर्चेत रोहितने हरभजन सिंगसोबत चॅट करणार असल्याचे संकेत दिले. युवराजसोबतच्या इंन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये रोहित म्हणाला की मला आता हरभजनसोबत चर्चा करायची आहे. यावेळी रोहितने त्याला कोणते प्रश्न विचारणार हे देखील सांगितले. तो म्हणाला की, आयपीएलमधील आवडता संघ कोणता? हाच भज्जीला पहिला प्रश्न असेल? त्याच्यासोबत चेन्नई सुपरकिंग्जशिवाय दुसरा पर्याय नसेल, असे उत्तर युवीने दिल्याचे पाहायला मिळाले.