पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आम्ही संघासाठी तर भारतीय खेळाडू स्वत:साठी खेळायचे'

इंजमाम आणि गांगुली (संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनी त्यांच्या काळातील प्रतिस्पर्धी भारतीय खेळाडू हे स्वत:साठी खेळायचे, असे मत व्यक्त केले आहे. इंजमाम यांच्या काळात भारत-पाक या दोन संघात पाक आतापेक्षा आघाडीवर असायचा. यावर भाष्य करताना इंजमाम यांनी तत्कालीन भारतीय खेळाडूंच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. पाकचे माजी क्रिकेटर रमीज राजा यांच्यासोबतच्या लाइव्ह चॅट शोमध्ये इंजमाम यांनी अनेक किस्से शेअर केले. या कार्यक्रमात ते म्हणाले की, तत्कालीन भारतीय संघातील फलंदाजी कागदावर आमच्यापेक्षा निश्चितच भारी होती. पण पाकिस्तानी खेळाडू हे संघासाठी खेळत असल्यामुळे आम्हाला त्यावेळी अधिक यश मिळायचे.  

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची देय रक्कम तूर्त स्थगित

इंजमाम पुढे म्हणाले की,  'जेव्हा आम्ही भारतीय संघविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरायचो त्यावेळी प्रतिस्पर्धी संघातील  फलंदाजी ही आमच्या संघाच्या तुलनेत अधिक मजबूत असायची. आमचे फलंदाज ३०-४० धावा करायचे. दुसरीकडे भारतीय संघाकडून काही जण शतकी खेळी करुन परतायचे. पण सांघिक कामगिरीच्या जोरावर यश आम्हालाच मिळायचे. शतक करणार संघासाठी नाही तर स्वत:साठी खेळायचा असा आरोप करताना त्यांनी कोणत्याही भारतीय खेळाडूचे नाव घेणे मात्र टाळले आहे.  आम्ही संघासाठी खेळायचो तर भारतीय संघ वैयक्तिक फायद्यासाठी खेळाचा हाच त्यावेळी दोन्ही संघातील फरक होता, असेही इंजमाम यांनी म्हटले आहे.  

कोरोना संकटात प्रत्येक कुटुंबाला ७५०० रुपये मिळावेतः सोनिया गांधी

या कार्यक्रमात इंजमाम यांनी पाकचे विद्यमान पंतप्रधान आणि  १९९२मध्ये पाक संघाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या इम्रान खान यांचेही कौतुक केले. या विश्वचषक स्पर्धेत इम्रान खान यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. सुरुवातीपासून ते इंजी खेलेगा तो हम जितेंगे! असे म्हणायचे. आम्ही विश्वचषक जिंकला पण मला यात महत्त्वपूर्ण योगदान देता आले नाही, अशी खंतही इंजमाम यांनी व्यक्त केली.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:If pakistan batsmen scored 30 or 40 runs it was for team and indian players scored centuries for themselves inzamam ul Haq