पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WTC Point Table : आफ्रिकेचा भोपळा, भारत टॉपला

ICC WTC Point Table: मध्ये भारतीय संघ अव्वलस्थानी

ICC World Test Championship (WTC Point Table) सलामीवीर रोहित शर्माची दोन डावातील दोन शतक आणि भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा दणाका दिला. आफ्रिकेच्या संघाने या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा शुभारंभ केला आहे.

पण सलामीच्या सामन्यातच त्यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे गुणांची पाटी कोरीच राहिली आहे. विशाखापट्टणमच्या मैदानात भारताने २०३ धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विश्व चॅम्पियनशिपमधील भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयामुळे भारताच्या खात्यात ४० गुणांची भर पडली असून १६० गुणांसह भारतीय संघ अव्वलस्थानावर आहे. 

यापूर्वी भारताने विंडीज दौऱ्यावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांना २-० असे पराभूत केले होते. प्रत्येक सामन्यातील ६० गुणासह भारताच्या खात्यात १२० गुण जमा झाले होते.  

वर्ल्ड चँम्पियनशीपची गुण पद्धती खालीलप्रमाणे 

#दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजेत्यास ६० गुण, मालिका बरोबरीत सुटली तर ३० आणि मालिका अनिर्णित राहिल्यास २० गुण दिले जातात. 

# तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजेत्या संघाच्या खात्यात ४० गुणांची भर पडते. मालिका बरोबरीत राहिली तर २० आणि ड्रॉ राहिल्यास १३ गुण प्राप्त होतात.  

#चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील मालिका विजेत्यास ३० गुण, मालिका बरोबरीत राहिल्यास १५ गुण तर सामना अनिर्णित राहिल्या १० गुण दिले जातात. 

# पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजेत्यास २४ गुण, ही  मालिका बरोबरीत सुटल्यास १२ गुण तर मालिका अनिर्णित राहिल्या १२ गुण दिले जातात (बरोबरी आणि अनिर्णित मालिकेच्या निकालामध्ये प्रत्येकी संघास समान गुणांची विभागणी करण्यात येते)

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची मालिका सुरु आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात उद्यापासून २ सामन्यांच्या कसोटी मालिकेस सुरुवात होणार आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Test Championship Points Table india vs south africa 1st test rohit sharma mohammed shami ravindra jadeja r ashwin help India to win team India on top spot