पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया अव्वलस्थानी

विराट कोहली

ICC World Test Championship: WTC Point Table: गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत यजमान विंडीजचा खेळ चौथ्या दिवशीच खल्लास करत कसोटी मालिका २-० अशी जिंकली. या विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या खात्यात ६० गुण जमा झाले. मालिकेतील सलग दोन विजयानंतर भारताच्या खात्यात आता १२० गुण जमा झाले असून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिके भारतीय संघ अव्वलस्थानी पोहचला आहे.  

वेस्ट इंडिजला व्हॉईट वॉश, विराट कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार!

भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजसमोर ४६८ धावांचे लक्ष्य दिले होते. विंडीजचा डाव चौथ्या दिवशीच २१० धावांवर आटोपला. विराटच्या नेतृत्वात कसोटी सामन्यातील भारताचा हा २८ वा विजय ठरला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २ पैकी दोन कसोटी सामने जिंकून १२० गुणांसह भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंड-श्रीलंका अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. या दोन्ही संघात झालेल्या दोन कसोटी सामन्यात पहिला सामना श्रीलंकेने तर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला होता. न्यूझीलंड दोन पैकी एका सामन्यातील विजयासह ६० गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर असून श्रीलंका ६० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

WTC Point Table: , भारत-विंडीज मालिकेपूर्वी लंका अव्वलस्थानी होते 

अ‍ॅशेस मालिकेतील इंग्लड-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत झालेल्या तीन कसोटी सामन्यात दोन्ही संघानी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला. तर यांच्यातील एक सामना अनिर्णित राहिला. या दोन्ही संघाच्या खात्यात प्रत्येकी ३२-३२ गुण जमा झाले असून गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया चौथ्या तर इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. विंडीजला अद्याप खातेही उघडता आलेले नाही. दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तान हे तिन संघ अद्याप आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या मैदानात उतरण्याच्या प्रतिक्षेत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Test Championship Points Table India on top spot after sweep series vs West Indies