पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WTC Point Table: 'विराट' विजयासह भारतीय संघाचे द्विशतक!

भारतीय संघ अव्वल

ICC World Test Championship Point Table: पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत करत भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. आफ्रिकेला एक डाव, एक दिवस आणि १३७ धावांनी नमवत भारताने ४० गुण कमावत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये २०० गुणांसह अव्वलस्थान कायम राखले. गुणतालिकेत दोनशेचा टप्पा पार करणारा भारत पहिला संघ ठरला आहे.  

IND vs SA : पुण्यात भारताचा एक डाव अन् १३७ धावांनी ऐतिहासिक विजय 

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताचा हा सलग चौथा विजय आहे. पुण्याच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीच भारताने आफ्रिकेचा खेळ खल्लास केला. या कसोटीतील पहिल्या डावात भारताने ५ बाद ६०१ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २७५ धावांत आटोपत विराटने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देत दुसऱ्यांदा खेळण्यास बोलवले. या डावात भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फंलदाजांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले. आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात १८९ धावांत गारद झाला.   

INDvsSA: आर. अश्विनची आफ्रिकेविरुद्ध @50

उल्लेखनिय आहे की, भारत, न्यूझीलंड. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या शर्यतीत उतरले आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान या संघाचा प्रवास अद्याप सुरु झालेला नाही. भारतीय संघ चार सामन्यांतील विजयासह अव्वलस्थानी आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका दोन पैकी १ विजय आणि १ पराभव स्वीकारत ६० गुणासंह अनुक्रमे  दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. ५ सामन्यांच्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेनंतर २ विजय दोन पराभव आणि १ अनिर्णित सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया (५६) आणि इंग्लंड (५६) चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघ  प्रत्येकी दोन-दोन सामन्यातील पराभवामुळे अद्याप खातेही उघडू शकलेले नाहीत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world test championship points table india beat South Africa by an innings and 137 runs in 2nd Test clinch series virat and company on top spot with 200 points