श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याने क्रिकेटच्या मैदानातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात झाली आहे. आयसीसी चॅम्पियनशीपच्या पहिल्या तीन सामन्यानंतर श्रीलंकन संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडच्या खात्यममध्ये अद्याप एकही गुण जमा झालेला नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात उद्यापासून कसोटी मालिका रंगणार आहे. या कसोटीला प्रारंभ होताच आणखी दोन संघांची यात भर पडेल.
दुसरीकडे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉर्डसच्या मैदानावर कसोटी सामना अनिर्णित राखल्यानंतर त्यांच्या खात्यावर ८ गुण जमा झाले आहेत. श्रीलंकेच्या खात्यात ६० तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ३२ गुण जमा झाले आहेत.
वर्ल्ड चँम्पियनशीपची गुण पद्धती खालीलप्रमाणे
#दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजेत्यास ६० गुण, मालिका बरोबरीत सुटली तर ३० आणि मालिका अनिर्णित राहिल्यास २० गुण दिले जातात.
# तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजेत्या संघाच्या खात्यात ४० गुणांची भर पडते. मालिका बरोबरीत राहिली तर २० आणि ड्रॉ राहिल्यास १३ गुण प्राप्त होतात.
#चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील मालिका विजेत्यास ३० गुण, मालिका बरोबरीत राहिल्यास १५ गुण तर सामना अनिर्णित राहिल्या १० गुण दिले जातात.
# पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजेत्यास २४ गुण, ही मालिका बरोबरीत सुटल्यास १२ गुण तर मालिका अनिर्णित राहिल्या १२ गुण दिले जातात (बरोबरी आणि अनिर्णित मालिकेच्या निकालामध्ये प्रत्येकी संघास समान गुणांची विभागणी करण्यात येते)
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची मालिका सुरु आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात उद्यापासून २ सामन्यांच्या कसोटी मालिकेस सुरुवात होणार आहे.