इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ आज मुंबईहून इंग्लंडला रवाना झाला. 30 मे पासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील प्रबळ दावेदार असणारे शिलेदार इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंची रिलॅक्स अंदाजातील काही फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत. यात धोनीसह अन्य काही खेळाडू आपापल्या टॅबमध्ये डोकावून बसल्याचे तर विराटसह काहीजण निवांतपणे गप्पा गोष्टी करताना दिसत आहेत.
Jet set to go ✈✈#CWC19 #TeamIndia pic.twitter.com/k4V9UC0Zao
— BCCI (@BCCI) May 21, 2019
बड्या मोहिमेला जाण्यापूर्वी शास्त्री धोनीबद्दलही भरभरुन बोलले
बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंचे काही फोटो अधिकृत सोशल अकाउंटवरुन शेअर केले आहेत. यात युदवेंद्र चहल, मोहम्मद शमी यांच्या स्क्रिनवर ते पब्जी गेम खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तर यांच्यासोबत एमएस धोनीही आणि भुवनेश्वर ही मंडळीही आपल्या टॅबमध्ये गुंग झाल्याचे दिसते. याव्यतिरिक्त काही फोटोमध्ये कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि केएल राहुल, विजय शंकर, रोहित शर्मा, केदार जाधव हे निवांत गप्पा गोष्टी करताना पाहायला मिळाले.
World Cup 2019 : यंदाची विश्वचषक स्पर्धा सर्वात आव्हानात्मक : विराट कोहली
बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांच्याही अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारतीय संघातील खेळाडू पब्जी प्रेमी असल्याचे ट्विट एका नेटकऱ्याने केला आहे.