पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WC Warmup Match : भारत दुसऱ्या ट्रायलध्ये बांगलादेशला तरी झिंगवणार का?

धोनीसह भारतीय संघातील खेळाडू

कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यात मंगळवारी सराव सामना रंगणार आहे. दोन्ही संघ विश्वचषकातील मुख्य सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी दुसरा आणि अखेरचा सराव सामना खेळण्यासाठी उद्या मैदानात उतरणार आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला होता. तर भारतीय संघाला याच मैदानात न्यूझीलँडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघ हा यंदाच्या विश्वचषकातील प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे दुसऱ्या सराव सामन्यात तरी भारतीय संघ बांगलादेशला पराभूत करत आपला खरा रुबाब दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Video : विराटच्या क्लिन बोल्डवर भारत-पाक चाहत्यांमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

यंदाची स्पर्धा ही रॉबीन राउंड पद्धतीने खेळवण्यात येणार असल्यामुळे मुख्य स्पर्धेत भारत बांगलादेश यांच्यातील सामना २ जूलै रोजी नियोजित आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असतील. भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी आत्मविसाने मैदानात उतरण्यास उत्सुक असेल. तर पहिला सराव सामन्यावर पाणी फिरल्याने या सामन्यात चांगली कामगिरी करुन विश्वचषकात उलथापालथ करण्याची क्षमता सिद्ध करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असेल.

ICC WC 2019: 'यंदा पाक भारताविरुद्धचा खराब विक्रम मोडीत काढेल'

न्यूझीलँड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजीने निराश केले होते. न्यूझीलँड विरुद्ध क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट सलामीच्या जोडीसह  कर्णधार विराट कोहलीलाही मैदानात तग धरता आला नव्हता. ही पुनरावृत्ती पुन्हा दिसू नये, अशीच भारीतीय क्रिकेट चाहत्यांची संघाकडून अपेक्षा करत आहेत.