पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : भारतीय संघातील सल्लू भाईजान अन् रोहितची 'गंमत जंमत'

रोहित शर्मा

बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यासाठी भारतीय संघ लंडनहून कार्डिफ शहरात दाखल झाला आहे. संघातील सदस्यांचा ताफा एकाच बसमधून कार्डिफला पोहचला. यादरम्यान बसमध्येच रोहित शर्माने सहकारी जडेजा आणि केदार जाधवची मुलाखत घेतल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माने या संदर्भातील व्हिडिओ इन्टाग्रामवरुन शेअर केला आहे. यात तो रविंद्र जडेजा आणि केदार जाधव यांच्यासोबत बोलताना दिसत आहे.   

विराटच्या क्लिन बोल्डवर भारत-पाक चाहत्यांमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

यात रोहितने सर्वप्रथम न्यूझीलँड विरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी केल्याबद्दल जडेडाचे अभिनंदन केले. तर विश्वचषकातील पुढील सामन्यात अशीच कामगिरी करु, असा विश्वास जडेजाने व्यक्त केला. त्यानंतर रोहितने आपला मोर्चा केदारकडे वळवला. केदार जाधव 'रेस ४' चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत दिसू शकतो, असे रोहितने म्हटले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Bus drives are fun! PS - listen carefully! @kedarjadhavofficial @royalnavghan

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला संघ सहकारी एखाद्या विशेष नावाने बोलवतात. केदारला सलमान भाई म्हणून चिडवले जाते. याच पाश्वभूमीवर रोहितने तो आगामी चित्रपटात झळकणार असल्याचे म्हटले. यावर रोहितची फिरकी घेत केदारने यावर गंमतीशीर उत्तर दिले. चित्रपटासंदर्भात बोलणी सुरु आहेत. चाहत्यांना सरप्राइज मिळू शकते, असे तो म्हणाला. हा व्हिडिओ क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. 

World Cup : 'डोन्ट व्हरी... आम्ही कमबॅक करु'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc world cup rohit sharma shared a video with ravindra jadeja and kedar jadhav watch here