पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#PAKvBAN बांगलादेशच्या ८ धावा होताच पाक 'आउट' न्यूझीलंड 'इन'

पाक आउट, न्यूझीलंड इन

लंडन येथील लॉर्डसच्या मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित ५० षटकात ९ बाद ३१५ धावा करत बांगलादेशसमोर ३१६ धावांचे लक्ष ठेवले आहे. पण हा सामना जिंकला तरी पाकिस्तानच्या सेमीफायनलचे दरवाजे बंद होणार आहेत. 

ICC WC : हिटमॅन रोहित 'विश्व-विक्रमा'च्या उंबरठ्यावर

सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशच्या संघाला ७ धावांत ऑल आउट करावे लगाणार होते. अर्थात बांगलादेशसोबतच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान सलामीवीर इमाम उल हक १०० चेंडूत १०० धावांची खेळी केली. बाबरचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले तो ९६ धावा करुन बाद झाला.

#PAKvsBAN आम्ही ५०० धावा करु, काहीही हं सरफराज!

पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड यांच्यानंतर न्यूझीलंडच्या सेमीफायनलचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचा प्रत्येकी एक-एक सामना उरला असून या दोन सामन्यातील निकालावर सेमी फायनलच्या लढती निश्चित होतील.